Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग : अहिल्यानगर शिवजयंती मिरवणुकीत दोन गट आमने-सामने येत वाद


शिवजयंती मिरवणूक : अहिल्यानगर शहरात शिवजयंती निमित्त सायंकाळी भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. माळीवाडा एसटी स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तरुणांची मोठी गर्दी उसळली आहे. 

मात्र मिरवणुकीची सुरुवात होत असतानाच शहरातील माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि बोल्हेगाव परिसरातील माजी नगरसेवक कुमार वाकळे यांचे दोन गट आमने-सामने येत वाद झाला आहे. 

वाकळे गटाच्या समर्थकांचे जनता गॅरेज मंडळ आणि त्र्यंबके गटाच्या समर्थकांचे साई संघर्ष युवा मंडळ यांच्या मध्ये मिरवणुकीच्या क्रमवारी वरून वाद उफाळला. यामुळे एकच धावपळ उडाली. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने येत एकमेकांशी भिडले. 

मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. मिरवणुकीला आता प्रारंभ झाला असून तणावाची परिस्थिती निवळली आहे. 

Post a Comment

0 Comments