Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग न्यूज : माळीवाडा एसटी स्टँड समोर तुफान राडा.. दगडांचा साठा, काचांचा खच, कोतवाली पोलिसांची घटनास्थळी धाव

 
माळीवाडा एसटी स्टँड समोर तुफान राडा

दगडांचा साठा, काचांचा खच, कोतवाली पोलिसांची घटनास्थळी धाव 

अहिल्यानगर : अहिल्यानगर मधील माळीवाडा बस स्टँड समोर तुफान राडा झाला आहे. दोन रिक्षा चालकांमध्ये तुफान मारामारी झाली असून या मध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. 

समजलेल्या माहितीनुसार आज सोमवारी दुपारच्या सुमारास माळीवाडा स्टॅन्ड समोरील हॉटेल फेमस जवळ असणाऱ्या रिक्षा स्टँडवर हा प्रकार घडला. 

मुद्दसर शेख आणि वसंत मोकाटे यांच्यामध्ये वाद सुरू झाला. शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन त्यानंतर राडेबाजीत झाले. यावेळी MH 16 BC 3313 या रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बघ्यांची गर्दी जमली होती. घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी दगडांचा साठा, काचेचे तुकडे आढळून आले. शेख आणि मोकाटे यांच्यामध्ये नेमका कोणत्या विषयावरून राडा झाला. घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. 

कोतवाली पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे. 

Post a Comment

0 Comments