Subscribe Us

Header Ads

हिंदूंना होणारा त्रास थांबला नाही तर जागा दाखवून देऊ

 

मग या आधी हिंदू धर्म नव्हे तर कोणत्या विचारांची सत्ता मनपावर होती ? किरण काळेंचा सवाल 

अहिल्यानगर : आज मीतिला अहिल्यानगर महापालिकेला सुमारे ४९६ कोटी रुपयांची देणी आहेत .सद्यस्थितीत तातडीने २०४ कोटी थकीत असल्याने मनपा आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहे. अनेक देणे देण्याबरोबरच विविध शासकीय योजनेचा स्वहिस्सा भरण्यासाठी सुद्धा महापालिकेमध्ये छदाम नाही. 

या मुद्द्यांवरून लक्ष भरकटविण्यासाठी शहराचे लोकप्रतिनिधी हे वेगवेगळी विधानं करीत आहेत. आम्ही हिंदू आहोत. यापूर्वी मनपावर शिवसेने सारख्या खऱ्या हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता होती. लोकप्रतिनिधी स्वतः दोन वेळा महापौर होते. मग त्यावेळी हिंदू धर्म विचारांची सत्ता नव्हती तर अन्य कोणत्या विचारांची होती का, असा सवाल किरण काळे यांनी केला आहे. 

केंद्र व राज्यामध्ये हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे. आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीत अहिल्यानगर मनपावर देखील हिंदू धर्म विचाराची सत्ता बसवणार असल्याचे शहर लोकप्रतिनि म्हणाले होते. त्याचा काळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 

काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या आणि शिवसेना उबाठा गटाच्या वाटेवर असणाऱ्या काळे यांनी हिंदूंच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. 

काळे म्हणाले की, 

शहरामध्ये हिंदूंना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. हिंदू व्यापारी, हिंदू उद्योजक, हिंदू फेरीवाले, हिंदू युवक, हिंदू व्यावसायिक, हिंदू महिला, समस्त हिंदूंना मनपाच्या गलथान कारभारामुळे अनेक गोष्टींचा त्रास होत आहे. 

मनपा साधे वीज बिल भरू शकत नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा मनपाला दिला गेला आहे. तब्बल अकरा कोटी न भरल्यास पाटबंधारे विभागाने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर पाणी बंद झाले तर आमच्या लाडक्या हिंदू बहिणींनी हांडे घेऊन पाण्याला कुठ जायचं ? शहरात ठीक ठिकाणी खांदून ठेवल आहे. नियोजनशून्य कारभार सुरू आहे. त्या रस्त्यांच्या कामासाठी लागणारी स्वहिश्याची रक्कम भरण्यासाठीची दमडी सुद्धा मनपाकडे नाही. 

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे मनपाचे प्रस्तावित रुग्णालय रखडले आहे. नाट्यगृहाचा सांगाडा तसाच पडला आहे. फोटोसेशन करून कामाला सुरुवात करू अस आश्वासन देऊन तुम्ही नगरकरांची बोळवण करत आहात. 

काळे पुढे म्हणाले की, अमृत गटार योजना, अमृत पाणी योजना, फेज टू पाणी योजना, सौर ऊर्जा प्रकल्प, शहरातील सुमारे २४ प्रमुख रस्ते, नगरोत्थान जिल्हा योजनेतील तीन रस्ते या सगळ्या कामासाठी लागणारी स्वहिश्याची रक्कम देण्याची मनपाची स्थिती नाही. 

राज्यात, देशात आणि शहरात सर्व सत्तेची सूत्र, रिमोट कंट्रोल हा तुमच्याच हातात असून देखील तुम्ही रोज बोंबा मारता. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही बिनकामाचे झाले आहात. तुमचा अकार्यक्षमपणा झाकण्यासाठी तुम्ही त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करता हे नगरकरांना चांगलं ठाऊक आहे असे काळे म्हणाले. 

अन्यथा जागा दाखवून देऊ 

शहरातील हिंदूंना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सत्तेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करण्याची तुमची जबाबदारी आहे. बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना अनंत अडचणी आहेत. त्याबाबत त्यांनी मनपाकडे मागण्या केल्या आहेत. हिंदूंच्या नावाने दिशाभूल करणारी भाषणबाजी करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्यामुळे हिंदूंवर अन्याय होत आहे. हिंदूं वर होणार हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. हिंदूंना होणारा त्रास थांबला नाही तर दिशाभूल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण तर प्रामाणिक लोकांना त्रास 

मनपात आरोग्य विभागात झालेली आर्थिक अनियमितता आणि त्यातून झालेला भ्रष्टाचार उघड झाला आहे. मनपात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पाठराखण सत्ताधारी करतात. तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र त्रास दिला जातो. त्यांच्या विरोधात खोटी नाटी आंदोलन केली जातात. त्यांच्यावर नको ते आरोप करून त्यांच्यावर बदली करून घेण्यासाठी दबाव आणला जातो. 

इथून पुढच्या काळामध्ये आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या मानगुटीवर बसू आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असे किरण काळे म्हणाले. 

Post a Comment

0 Comments