अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरामध्ये शिवजयंती मिरवणुकीचा ज्वर आता टिपेला पोहोचला आहे. ढोल, ताशे, डीजेचा दणदणाट यामुळे मिरवणूक मार्गावरती वातावरण प्रफुल्लित झाले आहे. हजारोंच्या संख्येने तरुणाई डिजेच्या ठेक्यावर थीरकत आहे. पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचे फलक झळकत आहेत. "जिसको चाहिये टिपू सुलतान, उसे भेजो पाकिस्तान"... असे बॅनर घेत तरुणाई बेफाम होऊन नाचत आहे.
भगवे झेंडे, भगवे पंचे, जोरदार घोषणाबाजी यामुळे मिरवणूक मार्ग, बाजारपेठेचा परिसर दणाणून गेला आहे. विविध प्रतिष्ठान, मंडळ यामध्ये सहभागी झाले असून शहराच्या मध्य भागातील कार्यकर्त्यांसह उपनगरातून देखील मोठ्या संख्येने तरुणाई या मिरवणुकीसाठी शहरात आली आहे.
पोलीस मिरवणुकीवर लक्ष ठेवून असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत आहेत.
0 Comments