राहुल गांधींचा नियुक्तीला विरोध
नवी दिल्ली : सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आज निवृत्त होत आहेत. आता त्यांच्या जागी विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार हे 1988 च्या बॅचचे ज्येष्ठ आयएएस (IAS) अधिकारी आहेत. देशात निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्ती संदर्भातील नवीन कायदा आल्यानंतरची ही पहिली नियुक्ती आहे. त्यांचा कार्यकाळ हा 26 जानेवारी 2029 पर्यंत राहणार आहे.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या आणि गृहमंत्री अमित शहा व लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सदस्य असणाऱ्या त्रिसदस्यीय समितीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर राष्ट्रपतींकडे तशी शिफारस पॅनलच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठकीत मोदी आणि शहा यांचे कुमार यांच्या नावावर एकमत झाले होते. मात्र या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी त्यांची या नियुक्तीला असहमती असल्याचे म्हटले होते. तसे पत्र त्यांनी जारी केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयात याबाबतचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे ही बैठक होऊ नये.
काँग्रेसने याबाबत बोलताना म्हटले होते की, काँग्रेस पक्ष अहंकाराने काम करून शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घेण्याकरिता पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे तत्पूर्वी बैठक घेणे अयोग्य असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी. तरी देखील ही बैठक झाली होती. त्यानंतर आता कुमार यांची नियुक्ती झाली आहे.
कुमार यांच्या जागी आता निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीर सिंग संधू यांची निवड केली गेली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी पाच नावांवर चर्चेचा प्रस्ताव पुढे आला होता .परंतु राहुल गांधी यांनी याला नकार दिला होता.
सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी
मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या 19 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. 12 फेब्रुवारीला याबाबतची सुनावणी होणार होती. परंतु प्रकरण न्यायालयाच्या पटलावर सूचीबद्ध झाले नाही.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ विविध प्रशांत भूषण यांनी सदर मुद्दा द्विपक्षीय बेंच असणाऱ्या न्यायमूर्ती सिंह, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठा समोर सदर मुद्दा उपस्थित केला होता.
0 Comments