Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : अहिल्यानगर मनपावर हिंदू धर्म विचाराची सत्ता आणणार - आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर : केंद्रात आणि राज्यात हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे. आता आगामी काळात होणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये अहिल्या नगरच्या मनपावर हिंदू धर्म विचाराची सत्ता आणणार आहे. शहर विकासाच्या कामांबरोबरच आध्यात्मिकता देखील न थांबता पुढे घेऊन जाण्याचे काम सर्वांनी करावं. 

मंदिरांची उभारणी करत असताना त्यासाठी लोकांनी पुढे येऊन वर्गणी करण्याची गरज आहे. धार्मिक कार्याबाबत त्यातून आत्मीयता ही निर्माण होत असते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. 

सावेडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार तसेच सभामंडपाच्या उभारणीच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी संपत बारस्कर, किरण कराळे, अंजली आव्हाड, सतीश शिंदे, सागर मुर्तडकर, मयूर कुलथे, सचिन जगताप, शिवजित डोके, आप्पा खताडे, अमित खामकर, किशन गायकवाड, प्रसाद डोके, शुभम भगत, मयूर बांगरे, सचिन तुपे, सागर शहाणे, राहुल राऊत, राज मुंडलिक, प्रसाद कुलकर्णी, संतोष शिंदे, अभिजीत शिंदे, संदीप थोरात, मंगेश खिळे, बाळू खताळे, तात्या सिन्नर, प्रथमेश ढेरे आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments