हिंदूंनो सतर्क व्हा.. अन्यथा मंदिरांच्या ठिकाणी मदरसे, मज्जिदी उभ्या राहतील
अहिल्यानगर : काही दिवसांपूर्वी आम्ही बरेच लोक सिद्धटेकला गेलो होतो. सिद्धटेकला आम्ही सांगितलं होतं की, 'जिधर आयेगा अली, उधर आयेगा बजरंग बली!' अनेक ठिकाणी परवानगी आल्या की धार्मिक स्थळ, मदरसे बांधायचे. पण या परवानग्या आपल्यासारख्या हिंदू लोकांनी थांबवून ठेवल्या. कारण तसं करता येत नाही. त्यामुळे चुकीचे माणसं जर महानगरपालिकेत सत्तेत आली तर त्या माध्यमातून अशा कामांना परवानगी देतील.
त्यामुळे मंदिरांच्या ठिकाणी मदरसे आणि मज्जीदी उभ्या रहायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना सतर्क, जागरूक राहणं ही आता काळाची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले आहे.
सावेडीच्या प्रेमदान हडको येथील हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचा जीर्णोद्धार कार्यक्रम आ. जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, सतीश शिंदे, शिवजीत डोके, प्रसाद डोके, आप्पा खताडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले की, विकास कामे मी कालही केली, आजही करतो आहे आणि उद्याही करणार आहे. पण त्याचबरोबर आपल्याला धर्मकार्य देखील करावे लागणार आहे. शिक्षणाबरोबरच संस्कार देखील मिळाले पाहिजेत. ते धर्म कार्याच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळेच या परिसरातील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे.
जगताप म्हणाले की,
6 डिसेंबर 1992 मध्ये राम मंदिराच्या ठिकाणी असणारी वादग्रस्त वास्तू पाडली गेली. तेव्हापासून सबंध भारतातील लोक वाट पाहत होते की राम मंदिर केव्हा होईल. प्रभू रामचंद्र कधी त्या ठिकाणी विराजमान होतील. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जगामध्ये लोकप्रिय असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या माध्यमातून राम मंदिर उभे राहिले आहे.
राम मंदिर उभारण्यासाठी मंदिर समितीच्या माध्यमातून देशभरातून वर्गणी गोळा केली गेली. त्यामुळे प्रत्येक भारतवासीयाच्या हातभारतून मंदिर उभे राहिले आहे.
हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार देखील लोकवर्गणीतून उभारण्याच ठरवल आहे. प्रत्येकाच्या कुटुंबातून यासाठी फुल न फुलाची पाकळी दिली गेली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाचे योगदान गरजेच असल्याचं यावेळी जगताप म्हणाले.
0 Comments