Subscribe Us

Header Ads

राजकारण : गडाखांची ईव्हीएम पडताळणीतून माघार दहा ईव्हीएमवर घेतला होता आक्षेप

गडाखांची ईव्हीएम पडताळणीतून माघार
दहा ईव्हीएमवर घेतला होता आक्षेप

अहिल्यानगर : माजी मंत्री आणि नेवासा विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातील दहा ईव्हीएम मशीन वर आक्षेप घेत पडताळणीसाठी अर्ज केला होता. आता तो त्यांनी मागे घेतला आहे. आत्तापर्यंत दहापैकी अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या सात एवढी आहे.



लोकसभा निवडणुकीनंतर निलेश लंकेंकडून पराभूत झालेले उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील निवडणूक आयोगाकडे चाळीस ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रार केली होती. मात्र ती अजूनही कायम आहे. सत्तेत असणाऱ्याच भाजप पराभूत उमेदवाराकडून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली गेल्यामुळे हा चर्चेचा विषय झालेला आहे. असे असताना विरोधात असणाऱ्या पराभूत उमेदवारांकडून मात्र आक्षेप अर्ज मागे घेतले जात आहेत. हे विशेष.


विधानसभा निवडणुकीतील आत्तापर्यंत जिल्ह्यात दहा उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केला होता. यापैकी राम शिंदे, प्रताप ढाकणे, राणी लंके यांच्या अर्जांवर कोर्टाच्या आदेशानुसार पुढील निर्णय होणे अपेक्षित आहे. 

आतापर्यंत नऊ जणांनी कोर्टात याचिका दाखल केली असून यामध्ये डॉ.विखे पाटील, प्रा. राम शिंदे, बाळासाहेब थोरात, प्रताप ढाकणे, संदीप वर्पे, अभिषेक कळमकर यांचा समावेश आहे.

काय आहे प्रक्रिया ?


  • निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सात दिवसात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना एकूण ईव्हीएम मशीन पैकी पाच टक्के मशीन पडताळणीसाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. 
  • एका मशीन साठी ४७ हजार २०० रुपये एवढे शुल्क यासाठी आकारले जाते. 
  • कोणत्या उमेदवाराने निकालाला न्यायालयामध्ये आव्हान दिलेले नसेल तर निकालाच्या ४५ दिवसांनी ईव्हीएम पडताळणी करण्याची तरतूद आहे.


Post a Comment

0 Comments