आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर क्लिअर
आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एवढा वाढणार
वेतन वाढ (salary hike) : अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात लवकरच वाढ केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा आधार घेतला जातो. आता तो क्लिअर झाला असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणे अपेक्षित आहे याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग (8th pay commission) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन हे चालू स्थितीतील वाढत्या गरजा लक्षात घेऊन निश्चित केले जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे पाहता आठव्या वेतन आयोगाच्या (8th pay commission) माध्यमातून सरकार फिटमेंट फॅक्टर मध्ये मोठी वाढ करेल की ज्याच्यामुळे त्यांच्या पगारात देखील लक्षणीय वाढ होईल.
नेमका फिटमेंट फॅक्टर आहे काय ?
वेतन आयोग शिफारस करते त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ करायची हे या फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर ठरवले जाते. हा फॅक्टर एक गुणक असून याचा वापर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्याचबरोबर पेन्शन किती असावी हा कॅल्क्युलेट करण्यासाठी केला जातो. या फॅक्टर साठी महागाई किती आहे, कर्मचाऱ्यांच्या गरजा काय काय आहेत आणि सरकारची आर्थिक क्षमता कशी आहे हे पाहून त्या आधारावरती निर्णय घेतला जातो.
महागाईच्या प्रमाणानुसार कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये आणि पगारामध्ये किती वाढ करायची हे ठरविले जाते. वेतन आयोग हा गणनेच्या वेळी महागाईचा कर्मचाऱ्यांच्या एकूण जीवनशैलीवर नेमका काय परिणाम झाला आहे याचा सांगोपांग विचार करतो.
वेतन आयोग याबद्दलच्या शिफारसी करताना वीज, पाणी, इंधन, मनोरंजन, भाजीपाला, गहू, डाळी, तांदूळ, दूध, सण-वार, लग्नासारखे महत्त्वाचे प्रसंग यासारख्या बाबींवर किती खर्च येतो याचाही विचार करते.
तर दुसरीकडे वेतन आयोग लागू करून त्याप्रमाणे वितरण करताना सरकार देशाची आणि स्वतःची आर्थिक स्थिती कशी आहे याचीही पडताळणी करते. जर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत असतील तर अशा वेळी पगारात जास्त वाढ होण्याची शक्यता अधिकची असते.
पगार वाढ करण्याचा विचार करत असताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता देखील वाढली आहे काय याचाही विचार केला जातो. जर कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल तर वेतन आयोग सकारात्मकरित्या शिफारस करते.
खाजगी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना देत असलेल्या वेतनाचा देखील अभ्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढ करताना वेतन आयोग करत असते. यामुळे सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांसाठीचे स्पर्धात्मक वेतन कसे ठरवावे हे सोपे जाते.
मोठी वाढ अपेक्षित
आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांना याबद्दल विचारले असता त्यांचे म्हणणे आहे की, आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा वाढणार असून तो सुमारे २.५० ते २.७५ टक्क्यांच्या दरम्यान निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. हा मोठा हाईक (hike) आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 ते 35 टक्के पर्यंत भरीव मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे किमान पगाराच्या रक्कमेमध्ये जवळपास 40,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स पे, भत्ते यांचा देखील समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर पेन्शन धारकांची पेन्शन वाढवताना देखील हाच आधार घेतला जाणार आहे.
यापूर्वी किती होता पगार ?
सातव्या आयोगामध्ये (7th pay commission) पगारात वाढ होत असताना प्रति महिना सुमारे 18 ते 20 हजारांची वाढ करण्यात आली होती. त्याआधीच्या सहाव्या वेतन आयोगात (6th pay commission) कर्मचाऱ्यांना प्रति महिना सुमारे 8 ते 10 हजार रुपये वाढ दिली गेली होती.
0 Comments