Subscribe Us

Header Ads

Health : धोका वाढला... महाराष्ट्रातील जीबीएसचे रुग्ण वाढले


अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

NGR समाचार 18 न्यूज : गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या संशयीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. सध्या राज्यात संशयित रुग्णांचा आकडा १११ वर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यात या आजाराचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे जीबीएस सदृश प्रादुर्भावाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करावेत. तसा अहवाल सादर करून आवश्यकता उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ चव्हाण यांनी दिले आहेत. 

राज्यात संशयित रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. लगतच्या असणाऱ्या पुणे जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ८१ रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराच्या अनुषंगाने राज्य आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत. 

कोरोनामुळे सबंध राज्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. जीबीएस मुळे अशा प्रकारचा मोठा धोका उद्भवू नये यासाठी प्रशासन स्तरावर आरोग्य यंत्रणा सतर्क होत कार्यान्वित करण्यात आली आहे. 

नागनाथ चव्हाण यांनी म्हटले आहे की, 

अद्याप पर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. आम्ही त्याबाबतची माहिती सातत्याने घेत आहोत. जे रुग्ण जीबीएस सदृश लक्षणांचे आढळतील त्यांच्या तपासण्या आम्ही तातडीने करीत आहोत. प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून त्यासाठी लागणारा औषध साठा देखील जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. 

Post a Comment

0 Comments