आज अहिल्यानगर शहरात राजकीय उलथापालथ... शिवसेना उबाठा नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश ?
NGR समाचार 18 न्यूज : गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर शहरातील शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या तीन आजी-माजी नगरसेवकांसह माजी शहर प्रमुख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता शिवसेनेतील मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. आज गुरुवारी दुपारनंतर हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. तशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त होत आहे.
शिवसेनेचे उबाठा गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिंदे यांच्या शासकीय बंगल्यावर होणाऱ्या प्रवेश सोहळ्यामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. कदम, बोराटे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असून प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. आज त्याला मुहूर्त मिळणार काय हे पहावे लागणार आहे.
कदम, बोराटेंचे ठरलं
संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्यासमवेत अजून कोण कोण आजी-माजी नगरसेवक प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी माजी नगरसेवक दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, खैरे यांच्यासह शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी प्रवेश केला आहे. आज होणाऱ्या प्रवेश सोहळ्यानंतर कोणी कोणी प्रवेश केला याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
विक्रम राठोड, भगवान फुलसौंदरांचे काय ?
युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पक्ष बदला बद्दल चर्चा सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात ते पक्ष बदल करणार की नाही याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही स्पष्ट भूमिका या तीनही नेत्यांनी जाहीर केलेली नाही. असे बोलले जाते की राठोड, गाडे हे तूर्तास पक्ष बदल करण्याच्या तयारीत नाहीत. मात्र फुलसौंदर यांच्या बद्दलचा संभ्रम अद्यापही कायम आहे.
0 Comments